Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडघराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर

घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर


गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील बोरगाव ( बु)येथील घराची भिंत कोसळून त्यामध्ये एक माहिलेचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री बोरगाव( बु) येथे घडली. दोन जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

संततधार पावसामुळे गेवराई तालुक्यात आता पडझड सुरू झाली आहे. बोरगाव( बु) येथील घराची भिंत कोसळून त्यामध्ये प्रमिला उत्तम जाधव (४५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. विकास उत्तमराव जाधव (४८ )व छबुबाई विकास जाधव (४४) या दोघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना बोरगाव (बु) येथे मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर खांडवी येथे ४० खन माळवदाचे घर पडले आहे यात कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यात पडझडीमुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी सिरसदेवी येथील घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता.

Most Popular

error: Content is protected !!