बीड (रिपोर्टर): उद्धव ठाकरे शिवसेनेत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे यांची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगिगतले आहे.
बीड जिल्हा समन्वयक म्हणून काम करत असलेले बप्पासाहेब घुगे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुळकर व जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या आदेशावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून घुगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, जालना रोड येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळविण्यात आली आहे. सदरची हकालपट्टी ही जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केली आहे.