बीड (रिपोर्टर)ः- गेवराई येथील एका 20 वर्षीय तरुणाच्या पोटात चाकू भोसकण्यात आला होता. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. सदरील तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर डॉ.माजेद, डॉ.वाघमारे यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करुन त्याचे प्राण वाचवले आहे. सध्या तरुणाची प्रकृती सुधारत आहे. अवघड शस्त्रक्रिया करुन मुलाला जिवदान दिल्याबद्दल मुलाच्या घरच्यांनी डॉक्टराचे आभार मानले आहे.
गेवराई शहरातील सलमान गफ्फार सय्यद वय-20 वर्षे या तरुणाच्या पोटात त्याच्याच मेव्हण्याने चाकू भोसकून गंभीररित्या जखमी केले होते. या तरुणांची प्रकृती चिंताजनक होती. त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्या तरुणांची शस्त्रक्रिया डॉ.माजेद,डॉ.वाघमारे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली. शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी तरुणाचे प्राण वाचवले याबद्दल तरुणांच्या कुटूंबांनी डॉक्टरांचे आभार मानले. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रुग्णालयाच्या मेंट्रन रमा गिरी व इतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.