Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडओपीडीत उशीरा येणार्‍या दोन डॉक्टरांचा दोन दिवसाचा पगार कपात शल्यचिकित्सकांची तडकाफडकी कारवाई

ओपीडीत उशीरा येणार्‍या दोन डॉक्टरांचा दोन दिवसाचा पगार कपात शल्यचिकित्सकांची तडकाफडकी कारवाई


बीड (रिपोर्टर)- जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये नेहमीच डॉक्टर उशीरा येतात, लवकर निघून जातात, अशा अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या आहेत. दोन दिवसांपासून अस्थिरोग विभागाचे डॉ. सचिन देशमुख आणि स्त्रीरोग विभागाच्या डॉ. सबा दोन दिवस जिल्हा रुग्णालयात तब्बल तासाभराने उशीरा आल्याने त्यांचा दोन्ही दिवसांचा पगार तसेच मुकादम आदमाने यांचाही दोन दिवसाचा पगार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी कपात केला आहे.

जिल्हा रुग्णालयात जे डॉक्टर कार्यरत आहेत त्या सर्वांचे खासगी दवाखाने आहेत. सकाळी साडे आठ ते दुपारी साडे बारा आणि दुपारनंतर साडेचार ते पावणे सहा असा या रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांची काम करण्याची वेळ आहे मात्र या वेळेमध्ये बहुतांश डॉक्टर हे पंधरा ते वीस मिनिट उशीरा येतात आणि 10 ते 15 मिनिटाने लवकर जातात. डॉ. सचिन देशमुख आणि डॉ. सबा हे सकाळी ओपीडीमध्ये तब्बल तासाभराने उशीरा येऊनही रुग्णांशी अरेरावीने बोलतात. हा प्रकार जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. त्याच्या सोबतच याच रुग्णालयात मुकादम म्हणून काम करणारे अदमाने हेही सलग कोणतीही पुर्वपरवानगी न घेता जिल्हा रुग्णालयात गैरहजर राहिले. त्यामुळे दोन डॉक्टर आणि कर्मचारी अशा तिघांचा दोन दिवसांचा पगार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी कपात केल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!