गेवराई (रिपोर्टर)- मराठा आरक्षणासंदर्भात गेवराई तालुक्यातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून आज सकाळी राक्षसभुवन फाट्यावर वीस ते पंचेवीस गावकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्याचबरोबर महिलांनी तहसील कार्यालयासमो ठिय्या आंदोलन करत तहसील कार्यालय बंद केले आहे.
मराठा आरक्षणासाठी राक्षसभुवन फाटा येथे सकाळी अकरा वाजता 20 ते 25 गावकर्यांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्ग पुर्णत: ठप्प झाला होता. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली तर दुसरीकडे गेवराई तहसील कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन करून कार्यालयाचे कामकाज बंद केले.