मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत त्यांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची महत्वाची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल उद्या मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार असून मंत्रिमंडळ हा अहवाल स्वीकारणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. सरका उद्या जरांगेंच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असून शांतता पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केेले आहे.