बीड (रिपोर्टर)ः- ग्रामपंचायतला वैयक्तीक खाते जोडून सिंचन विहरीचे पैसे उचल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील ही बाब लक्षात आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या सिईओकडे तक्रार करण्यात आली. दोषी विरोधात कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिरुर तालुक्यातील मानूर येथे एकाने स्वतःच्या नावाने एक वेंडर तयार करुन त्याला वैयक्तीक खाते जोडण्यात आले. गेल्या तिन ते चार वर्षामध्ये अनेक जलसिंचन विहरी व सार्वजनीक कामाचे पैसे त्या वैयक्तीक खात्यात जमा केले. महत्वाची बाब म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या जलसिंचन विहरीचे पैसे ज्या खात्यावर पडले त्या लाभार्थ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. हे वैयक्तीक खाते ग्रामपंचायतच्या वेंडरला अॅड कसे झाले याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानूर ग्रामपंचायतचे सरपंच अशोक पाखरे यांनी जि.प.चे सिईओ यांच्याकडे केली आहे.











