आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
केज (रिपोर्टर): घर पाडून रस्ता का देत नाहीस? या कारणावरून एका शेतकर्यास मानसिक दिला जात असल्याने या त्रासाला कंटाळून सदरील शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपळगव्हाण येथे घडली. आत्महत्येपूर्वी शेतकर्याने चिठ्ठी लिहून ठेवली. या प्रकरणी सात जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामहरी श्रीरंग गायकवाड (वय 49 वर्षे) या शेतकर्यास रस्त्याच्या कारणावरून बाळासाहेब गायकवाड व इतर त्रास देत होते. घर पाडून रस्ता दे, असा तगादा त्यांच्याकडे लावला जात होता. रस्त्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करत मानसिक त्रास देण्यात येत असल्याने या त्रासाा कंटाळून रामहरी गायकवाड यांनी विषाी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत त्रास देणार्यांचा उल्लेख करण्यात आला. या प्रकरणी संतोष रामहरी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब गायकवाड, विजयमाला गायकवाड, सचिन गायकवाड यासह अन्य अशा सात जणांविरोधात कलम











