एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार आहेत. त्यापुर्वी या सर्व आमदारांनी गुवाहाटी येथील कामाख्य मंदिरात जावून दर्शन घेतले. या वेळी त्यांच्याशी माध्यमाने बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बच्चु कडू यांनी ‘जादूटोना केला त्यामुळे देवीच्या दर्शनाला आलोय’, असे म्हणत शिवसेनेच्या आरोपाला मिश्किल उत्तर दिले.