बीड (रिपोर्टर)ः-शासन कामगार विरोधी कायदे करत आहे. शासनाने कामगार विरोधी कायदे रद्द करावे यासह इतर मागण्यासाठी आज आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागरण संघर्ष यात्रा आयोजीत करण्यात आली होती. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. विशेष करुन या यात्रेमध्ये महिलांचा मोठा संख्येने सहभाग होता.
खाजगीकरणाचे धोरण मागे घेण्यात यावे, शेतकर्यांना स्वामीनाथन आयोग लागू करावा, सरकारी निमसरकारी सर्व रिक्त जागा भरण्यात याव्यात, महागाई, बेकारी कमी करण्यात यावी, कामगार विरोधी कायदे रद्द करावे, रिक्त पदे भरण्यात यावे, दत्तक शाळा योजना त्वरीत रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आज आयटक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागरण संघर्ष यात्रा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. या यात्रेमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.