Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडनोकर भरतीतील भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नोकर भरतीतील भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बीड (रिपोर्टर) नोकर भरतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी व पारदर्शकपणे नोकर भरती करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज सकाळी अखिल भारतीय नवजवान सभाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी कॉ. नामदेव चव्हाणसह आदींची उपस्थिती होती.
   राज्यातील सर्व नोकर भरतीच्या परीक्षा चतुर्थश्रेणी वगळता एमपीएससी मार्फत पारदर्शकपणे घेण्यात याव्यात. भगसिंग रोजगार हमी कायदा केंद्रात पास करावा यासह इतर मागण्यांसाठी तीव्र निदर्शने करर्‍यात आली. या वेळी कॉ. नामदेव चव्हाण, भाऊ प्रभाळे, ज्योतीराम हुरकुडे, अ‍ॅड. फिडेल चव्हाण, प्रशांत दगडखैर, रामहरी मोरे, संजय इंगोले, रामदास कदम, देवीदास पवारर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!