वडवणी (रिपोर्टर):- मौजे काडीवडगांव येथील चोरीच्या घटना घडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी शासकिय कार्यालय हिटलिस्टवर घेत वडवणी येथील बीएसएनएल कार्यालयावर डल्ला मारला आहे. वापरात असलेल्या एएच कँपिसीटीच्या 24 बँटऱ्या चोरी करत 70 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. तर सदरील चोरीची कामगिरी पाहून ऐकावं ते नवलच असे चित्र दिसून येत आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, भारत संचार निगम लिमिटेड या शासकिय कंपनीचे कार्यालय वडवणी शहरातील बाजार समितीच्या प्रंगणात कार्यरत आहे. याठिकाणी दि.4 ते 5 यादिवशी अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे लाँक तोडून आत प्रवेश करुन वापरात असणाऱ्या अमरराजा कंपनीचे 400 एएच कँपिसीटीचे 24 बँटरी सेल ज्याची किंमत 70 हजार रुपये आहे. सदरील माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.तर टेक्निशिल असणारे दत्ता भास्कर कुरे यांच्या फिर्यादीवरुन काल अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पो.हे.माळी हे करत आहेत.आज दुपार नंतर बीड येथून श्वान व फिंगर पथक येऊन कार्यालयाची तपासणी करणार आहेत.अशी माहिती देखील तपास अधिकारी यांनी दिली आहे. तर सहा ते सात दिवसांपुर्वीच मौजे काडीवडगांव याठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धूमाकुळ घातला होता.सदरील चोरटे सीसीटिव्ही कँमेरात कैद देखील झाले होते. या घटनेनंतर आता ऐकावं ते नवलच चित्र दिसून येत असून चोरट्यांनी शासकिय कार्यालयच हिटलिस्टवर घेतले आहेत का? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित राहत आहे.