Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडसर्व सभासद जनाधार पॅनलच्या पाठीशी -अ‍ॅड.हेमंत बप्पा औटे

सर्व सभासद जनाधार पॅनलच्या पाठीशी -अ‍ॅड.हेमंत बप्पा औटे


बीड (रिपोर्टर) श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँक हे बीड जिल्ह्याचे भुषण आहे. सदर बँकेने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती करुन मराठवाड्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. महाराष्ट्रामध्ये या बँकेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.इंजि.अर्जुनराव जाहेर पाटील यांनी या बँकेची स्थापना करुन,बँक प्रगतीच्या यशोशिखरावर नेली आहे.बहुजण समाजातील तरुणांना आर्थिक मदत करुन, स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या हेतूने, त्यांनी बँकेची स्थापना केली.बँकेच्या माध्यमातुन समाजातील हजारो तरुणांना आर्थिक मदत करुन, स्वतःच्या पायावर ताठ मानेने उभे केले. बँकेच्या माध्यमातुन सुमारे 500 कर्मचार्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला. बँकेच्या स्थापनेपासून दरवर्षी नफ्यात असणारी व सभासदांना लांभाश वाटप करणारी ही मराठवाड्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे. बँकेने सातत्याने अ वर्ग राखला आहे. या बँकेकडे समाज आदराने पाहत आहे.

बँकेचा विस्तार संपुर्ण महाराष्ट्रात असून, 46 शाखेमधुन बँकेचे कार्य चालु आहे. अथक परिश्रमामधुन कै.इंजि.आप्पासाहेब यांनी ही बँक उभी केली आहे. सदर बँकेच्या माध्यमातुन समाजातील सर्व घटकांना, बँकेचे कर्मचारी विनम्र सेवा देत आहेत. सभासदांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी अद्यावत अशा सर्व इंटरनेट बँकींग सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. बँकेचे सभासद बँकेच्या सेवेवर पुर्ण समाधानी आहेत. सभासदांचा अढळ असा विश्‍वास विद्यमान संचालक मंडळावर आहे. बहुजण समाजातील तरुणांच्या हितासाठी हि बँक मोठे आशास्थान आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.इंजि.आप्पासाहेब यांच्या मृत्यूनंतर, बँकेची धुरा त्यांचे सुपुत्र इंजि.अजय पाटील हे सांभाळत आहेत.
त्यांचे कार्यकाळातही बँकेची प्रगती अविरत चालु आहे. कोव्हीड-19 सारख्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये व्यापारी आणि उद्योजक यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक व्यवसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा परिस्थितीतही बँकेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.आप्पासाहेब यांनी घालवुन दिलेल्या मार्गानेच विद्यमान संचालक मंडळ कार्य करत आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे. बँकेचे सभासद सुज्ञ आहेत. त्यांचा विद्यमान संचालक मंडळावर पूर्ण विश्‍वास आहे. विरोधकाकडे बँकेच्या प्रगतीचा कोणताही अजेंडा नाही. ते केवळ भूलथापा देऊन मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. सभासद जनाधार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ढाल-तलवार या चिन्हावर मतदान करुन निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजयी करतील आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील. असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!