Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईवाजपेयी हिंदुत्ववादी होते पण धर्मांध नव्हते

वाजपेयी हिंदुत्ववादी होते पण धर्मांध नव्हते


सबका साथ सबका विकास’ हे त्यांनाच शोभतं -राऊत
मुंबई (रिपोर्टर) अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्ववादी होते, पण ते धर्मांध नव्हते. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, याच भावनेने त्यांनी नेहमी काम केले. त्यामुळे जनता वाजपेयी यांच्याकडे एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा नेता म्हणून पाहत असते. ’सबका साथ सबका विकास’ हे त्यांनाच शोभतं, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी दिवंगत माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!