बंदला वंचित बहुजन
आघाडीचा पांठीबा
गेवराई (रिपोर्टर) दि. 11 इंदापूर येथील शेतकर्यांच्या दुध दरवाढ अंदोलनास भेट देण्यासाठी जात असतांना आ. गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकुन भ्याड हल्ला केला तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात मतदान केले म्हणून निर्मळ पिंप्री (जि. अहमदनगर) येथील दोन बौध्द कुटुंबावर 400 ते 500 जातियवादी मानसिकतेच्या समाजकंटकांनी जिवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवार दि. 11 रोजी उमापूर ता. गेवराई जि. बीड येथे व्यापारी बांधवांनी व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवुन निषेध व्यक्त केला.
सविस्तर वृत्त असे की दि. 9 डिसेंबर रोजी इंदापूर येथील शेतकर्यांच्या दुध दरवाढ अंदोलनास शासनाचा प्रतिनिधी म्हणून भेट देण्यासाठी जात असतांना, घोषणाबाजी करत आ. गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने काही समाज कंटकांनी चप्पला भिरकावल्या भ्याड हल्ला केला तसेच मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात मतदान केले म्हणून निर्मळ पिंप्री (जि. अहमदनगर) येथे जातिवाचक शिवीगाळ करत यांची खैरलांजी करावी लागेल, यांना मनिपूरसाखे करावे लागेल असे शब्दप्रयोग करत 400 ते 500 जातियवादी मानसिकतेच्या समाजकंटकांनी दोन बौध्द कुटुंबावर मध्यरात्री बौध्द वस्तीवरील लाईट बंद करुन तलवारी, कुर्हाडी, कोयते, लाठ्या काठ्यासह घरावर दगडफेक करुन जिवघेणा हल्ला केला तसेच गाड्यांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ सोमवार दि. 11 रोजी उमापूर ता. गेवराई जि. बीड येथे ओबीसी व बौध्द यांनी उमापूर बंदचे चकलांबा पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन व्यापारी बांधवांना आवाहन केल्यावरून व्यापारी बांधवांनी व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवुन निषेध व्यक्त केला.











