Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनाआज संध्याकाळी जिल्ह्यासाठी निर्बंधाची नियमावली, लग्नासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी;...

आज संध्याकाळी जिल्ह्यासाठी निर्बंधाची नियमावली, लग्नासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी; जिल्हा प्रशासनाचे आदेश निघणारबीड (रिपोर्टर) राज्यात कोरोनासह ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे पाहून राज्य शासनाने कंोर निर्बंधांना सुरुवात केल्यानंतर आज बीड जिल्हा प्रशासनानेही जिल्हावासियांसाठी काही निर्बंध लादण्याची तयारी सुरू ठेवली आहे. आज संध्याकाळपर्यंत बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी निर्बंधांच्या सुचना येणार असून लग्नासाठी केवळ 50 लोकांची उपस्थिती तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी दिली जाणार असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. याचबरोबर जमावबंदी आदेशासह सार्वजनिक ठिकाणी अथवा बाजार पेठांमध्ये होणारी गर्दी रोखण्याबाबत जिल्हा प्रशासन काय प्रयत्न करायचे यावर आज किंवा उद्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ, तहसीलदार, नगर परिषदेचे सीओ यांची महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत.

राज्यभरात कोरोनासह ओमिक्रॉनचे रुग्ण गेल्या दोन दिवसात दुपटीने आणि तिपटीने वाढत असल्याने राज्य सरकार एकीकडे सतर्क होत मध्यरात्रीपासून नव्या निर्बंधांची अमलबजावणी करत असताना बीड जिल्हा प्रशासनानेही आता कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सावध भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने जिल्हावासियांसाठीही आज संध्याकाळपर्यंत नवे निर्बंध लावण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आटोक्यात असून 800 ते 1000 संशयितांची तपासणी केल्यानंतर दोन ते पाच रुग्ण आढळून येत आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार निर्बंधाबाबत त्या त्या जिल्हाधिकार्‍यांना स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत त्यामुळे बीड जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही निर्बंद लागू केले आहेत. यामध्ये विवाहसाठी केवळ 50 लोकांना परवानगी असणार आहे, अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून तो 14 जानेवारीपर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर शहरातील बाजारपेठांमध्ये, मॉलमध्ये, हॉटेलमध्ये होणारी गर्दी पाहता त्यावर काय उपाययोजना करायची यावर जिल्हा प्रशासन विचार करत आहे. पुढील निर्बंधाबाबत अथवा नियमावलीबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांची महत्वपुर्ण बैठक आज किंवा उद्या होणार आहे. आज संध्याकाळी जिल्हा प्रशासनाकडून निर्बंधाची नियमावली सादर होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!