बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. सोयाबीनसह कापसाचे उत्पादन घटले. कापसाचे उत्पादन घटूनही कापसाला योग्य भाव मिळत नाही. 7 हजार 300 वरून कापूस 7 हजार 74 वर आला आहे.
बीड जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनची जास्त प्रमाणात लागवड होत असते. यावर्षी कमी पाऊस पडल्याने दोन्ही पिकांच्या उत्पादनात घट झाली. उत्पादन घटूनही कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले. काही दिवसांपूर्वी कापसाला 7 हजार 200, 300 या प्रमाणे भाव होता. आजस्थितीत कापसाला 7 हजार 70 रुपये भाव राहिला आहे. भाव कमी होत असल्याने शेतकरी कोंडीत सापडले.











