Friday, January 28, 2022
No menu items!
HomeUncategorizedकार्यकर्त्यांनो सावधान! राज्यातल्या १० मंत्र्यांसह २० आमदारांना कोरोना

कार्यकर्त्यांनो सावधान! राज्यातल्या १० मंत्र्यांसह २० आमदारांना कोरोना

बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतींची रणधुमाळी; प्रचारासाठी पुढार्‍यांचा मेळा, गर्दीचे ठिकाण टाळा सोशल डिस्टन्स पाळा
बीड (रिपोर्टर) राज्यात कोरोना संसर्गासह ओमिक्रॉनने पुन्हा डोके वर काढले असून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच राज्यातल्या दहा मंत्र्यांसह २० आमदारांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याने कार्यकर्त्यांनो सावधान म्हणण्याची वेळ आज बीड जिल्ह्यात येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू असून वेगवेगळ्या पक्षांचे नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी या चार शहरांसह जिल्ह्यात इतरत्र फिरताना दिसून येत आहेत. त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांचा लवाजमाही पहायला मिळतो मात्र आता कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी गर्दीपासून दूर राहणे महत्वाचे आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भीमा कोरेगावात पत्रकारांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. राज्यात बड्या विवाह सोहळ्यांना व अन्य कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सांगत चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील दहा मंत्री आणि २० आमदार कोरोना बाधीत झाले आहेत. यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के.सी.पाडवी, ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खा. सुप्रियाताई सुळे, आ. सागर मेघे, आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. शेखर निकम, आ. इंद्रनिल नाईक, आ. चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), आ. माधुरी मिसाळ, माजी मंत्री दीपक सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य काहींचा यामध्ये समावेश आहे. बीड जिल्ह्यात सध्या नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी येथे नगरपंचायत निवडणुकीनिमित्त प्रचार सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते प्रचारात सक्रिय आहेत. त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनो सावधान म्हणण्याची वेळ आली असून गर्दीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी जावू नये अथवा गर्दी न करता सोशल डिस्टन्सचे पालन करावे.

Most Popular

error: Content is protected !!