बीड (रिपोर्टर): सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालक यांच्या विविध मागण्याठी दिनांक 18,19 व 20 डिसेंबर 2023 या तीन दिवसासाठी बीड जिल्हयातील 1033 ग्रामपंचायतीसह राज्यातील 27869 ग्रामपंचायतीचे तीन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय सदरील संघटनानी एकत्रीत घेतला आहे.
सदरील तीन दिवस काम बंद आंदोलन करण्याबाबत सर्वच संवर्गाच्या राज्य संघटनेच्या माध्यमातुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री व रोजगार हमी योजना मंत्री यांना निवेदन देऊन कळवण्यात आले आहे.
राज्यातील सर्वच ग्रामपंचायती आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे . ग्रामपंचायत कराची वसुली परिणामकारक होण्यासाठी या विषयावर ग्रामविकास विभागाने तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा. आमदार निधी प्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना निधी राज्यस्तरावरूण देण्यात यावा. ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता, सरपंच, उपसरपंच यांचे थकीत मानधन तात्काळ अदा करावे व त्यात भरीव वाढ करण्यात यावी. विमा संरक्षण दयावे, शासकीय कमिटीत स्थान असावे, टोल माफी मिळावी इत्यादी मागण्यासाठी हा तीन दिवसाचा काम बंद संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्हयातील सर्व सरपंच , ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालक यांनी 100 % सहभागी होण्याचे आवाहान महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 चे मराठवाडा विभागीय सचिव सखाराम काशिद, बीड जिल्हा अध्यक्ष मधुकर शेळके व जिल्हा सरचिटणीस अविनाश राठोड यांनी केले आहे.