• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अग्रलेख -तरुणांच्या मस्तकी आग,सत्ताकारणाच्या गंडास्थानाला हात

by गणेश सावंत
December 17, 2023
Reading Time: 1 min read
0
अग्रलेख -तरुणांच्या मस्तकी आग,सत्ताकारणाच्या गंडास्थानाला हात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत -9422742810

नही चलेंगी..नही चलेंगी… तानाशाही नही चलेंगी, भारत माता की जय, संविधान बचाओ, बेरोजगारांना न्याय द्या, अशा घोषणा देत 13 डिसेंबर 2023 रोजी भारताच्या सर्वोच्च संसद भवनात दोन तरण्याबांड पोरांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या, नव्हे नव्हे तर त्यांनी ‘धूर बॉम्ब’चा धुराडा उडवत काहीक्षण उपस्थित खासदारांच्या दिलांची धडकन रोखून धरली. घटना अत्यंत गंभीर. जे लोकशाहीचे सर्वात मोठे शक्तिस्थान त्या शक्तीस्थानाच्या गंडास्थानालाच जणू या तरण्याताठ्या बेरोजगारांनी हात घालून सरकारच्या व्यवस्थेचे आणि सुरक्षेच्या चिंधड्या उडवून टाकल्या. दोन तरुण आतमधून घोषणा देत होते तर एक तरुणीसह अन्य एकजण संसदेच्या बाहेर धूरबॉम्बचा वापर करत घोषणाबाजी करत होता. या घटनेतून समोर काय यायचे ते येईल परंतु एवढे निश्‍चित.. भारताची संसद ही असुरक्षित आहे. त्याच ठिकाणी अतिरेकी अथवा अन्य कोणी माथेफिरूंनी सशस्त्र प्रवेश केला असता तर काय झाले असते…?
आठवा तो
13 डिसेंबर 2001 चा
दिवस… त्या दिवशी जुन्या संसद भवनावर असाच हल्ला झाला होता. त्या वेळी पाच ते सात जणांना शहादत पत्करावी लागली होती. खासदारांना जीव मुठीत घेऊन थेट ईश्‍वराची आठवण झाली होती. त्या 13 डिसेंबर 2001 च्या हल्ल्यातून भारतीय सुरक्षा व्यवस्थेने काय शिकून घेतले? हा सवाल काल-परवाच्या घटनाक्रमानंतर पुन्हा उपस्थित होतो. एकतर जुन्या संसदेपेक्षा नवीन संसद भवनात सर्वकाही विशिष्ट स्वरुपात वैज्ञानिक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर सुरक्षा व्यवस्था उभी करण्यात आल्याचे म्हटले. मात्र सकाळी 13 डिसेंबर 2001 च्या शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येते अन् तब्बल 22 वर्षानंतर भारताच्या संसदेत पुन्हा सुरक्षा व्यवस्था भेदून भारताचेच तरणेताठे पोरं आतमध्ये घुसखोरी करतात. सोबत धूरकांड्या घेऊन जातात, प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारतात, तानाशाही नही चलेंगी ची घोषणा देतात, भारत माता की जय म्हणतात, यातून अखंड देशाच्या तरुणांच्या मनातली धगधग जशी समोर येते, तशी आमची सुरक्षा यंत्रणा नेभळट आहे, याची शंका नक्कीच उपस्थित होते. अनेक वेळा भारतीयांनी शत्रुंचे हल्ले पचविले आणि परतविले, परंतु आता हल्लेखोरच व्यवस्थेच्या विरोधात हल्ला करू पाहत असतील तर त्या देशाचे भविष्य आणि भवितव्य काय असेल, जिथे बेरोजगार पुन्हा एकदा ‘इन्क्लाब’चा नारा देऊ पाहत असतील आणि
स्वत:च्याच व्यवस्थेविरोधात
बंड उभारत
उभ्या जगाला देशाची वस्तूस्थिती मांडत असतील, तर हे अपयश नेमके कोणाचे? त्या मुलांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोघांनी जे काही कृत्य केले ते नक्कीच असमर्थनीय परंतु तेवढेच चिंताजनक म्हणावे लागेल. हा बंड आणि हा विद्रोह देशाचे भविष्य तर सांगत नाही ना! फ्रान्सच्या एका कविने म्हटले आहे, तुम्ही मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरची गाणी सांगा… मी तुम्हाला तुमच्या देशातलं भवितव्य सांगतो. संसदेच्या अधिवेशनामध्ये तरुण गोंधळ करतात अन् ‘तानाशाही नही चलेंगी’ ची घोषणाबाजी करत कलर बॉम्ब उडवतात तेव्हा आपले देशाचे भविष्य नेमके काय?आणि कसे असेल? हे त्यांच्या घोषणातून नक्कीच दिसून यायला हवे. जे तरुण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, ते तरुण जर एखाद्या विशिष्ट समुदायाचे असते तर त्यांना तात्काळ अतिरेकी घोषीत करता आले असते. ते तरुण जर एखाद्या जातीचे असते तर त्याला जातीचा रंग देत त्यावरही राजकारण करता आले असते. एखाद्या वेळेस ते तरुण एखाद्या राज्याचे असते तर तिथे प्रांतवाद उभा करता आला असता, परंतु पकडण्यात आलेले सर्व तरुण वेगवेगळ्या राज्यातले आहेत, कोणी हरियाणाचा आहे, आमच्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर आपल्या बीड जिल्ह्याच्या लगत असलेल्या लातूरचा शिंदे नामक बेरोजगार तरुण या घटनाक्रमात आहे. तो पोलीस भरतीची आणि सैनिक भरतीची तयारी करत होता. त्याला या आले नाही. माथे सटकले, आणि थेट त्याने संसद गाठले. त्याने जे कृत्य केले ते विघातकच. परंतु त्या कृत्यामागे आणि त्याचे माथे सटकण्यामागे आजची व्यवस्था नसेल हे कोणी छातीठोकपणे सांगू शकते का? तरुणांचे माथे सटकणे आणि तरुणांच्या मस्तकातली अळी वळवळ करणे म्हणजेच या देशाचे भवितव्य आणि भविष्य धोक्यात मानता येईल का? आम्ही हे प्रश्‍न उपस्थित करतोय, कारण
बीडमध्येही पोट्ट्यांचे
माथे भडकले
हे उभ्या महाराष्ट्राने नव्हे देशाने पाहिले. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आजचे नव्हे पाच दशकाचे आहे. या पन्नास वर्षांच्या कालखंडात अनेक लोक आमदार, खासदार झाले, मग ते मराठे होते, मराठेत्तर होते. परंतु आरक्षणाचा प्रश्‍न सुटला नाही. आजपर्यंत ज्या त्याने आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण केलं, सत्ताकारण केलं आणि स्वत:पुरती सत्तेची उब घेत वैयक्तिक विकासाचे बॉयलर घराघरात पेटवले. परंतु उपेक्षीत समाजाच्या अपेक्षित आशा-आकांक्षा पुर्ण केल्या नाहीत. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या अधिक अधिक दुबळा होत गेला. शेती उद्ध्वस्त होत राहिली, अर्थकारण निटसं जमेना अन् इथच आरक्षणाच्या मागणीवर मराठ्यांच्या पोट्ट्यांचे माथे भडकत गेले. जे शांततेच्या मार्गाने दहा-दहा लाखांचे मोर्चे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात निघाले त्याच मोर्चातल्या पोट्ट्यांनी शेवटी कायदे हातात घेतले. 30 ऑक्टोबरला बीडमध्ये जे घडले ते अनपेक्षित. सत्ताधारी असो वा विरोधक असो, जातीचा असो वा परजातीचा, कोणी कोणी पाहिले नाही. हे राजकराणी आहेत, हे सत्ताकारणी आहेत, एवढेच डोळ्यांसमोर ठेवून अठरा ते अठ्ठावीस वयोगटातल्या पोरांनी आमदारांची घरे जाळली, पुढार्‍यांची घरे जाळली, पक्षांचे कार्यालये पेटवून दिले. त्यावर आजही रणकंद उडतोय. अनेक राजकीय नेते आज स्पष्टपणे सांगतायत हे एवढं सोपं नाही, असच जर चालत राहिलं तर एकाही राजकीय नेत्याचं घर शिल्लक राहणार नाही. त्यांच्यावर कठोर करावाई झाली पाहिजे,
अरे पण त्यांची माथी
का भडकू देता?
बीडमध्ये ज्या पोट्ट्यांनी आपल्या मागण्यांसाठी जाळपोळसारखं शस्त्र उगारलं, नेतृत्वाबद्दल, लोकप्रतिनिधींबद्दल त्यांच्यात एवढी चीड का आली? पुढारी, सत्ताधारी, राजकारणी यांचे संसार नव्हे तर त्यांच्या लेकरांचे भवितव्यही चांगले असते आणि आपल्याच पदरी निराशा का येते? आपलं अर्थकारण डबघाईला का जातं? आपल्या बापाला राबराब राबूनही त्याच्या घामाचे पैसे का दिले जात नाहीत? असे एक ना अनेक प्रश्‍न जेव्हा पडतात आणि स्वत:च्या घराबरोबर स्वत:च्या भविष्यावर जणू गाढवाचा नांगर फिरवला जातोय, असं जेव्हा या तरुणांना वाटतं, तेव्हा ते आक्रमक होतात. त्या तरुणांच्या भविष्याबाबत त्यांच्या भुतकाळातच सत्ताधार्‍यांनी उपाययोजना केल्या असत्या तर हे विषय घडले असते का? भारताच्या संसदेमध्ये घुसखोरी करणार्‍या तरुणांनीही जी घोषणाबाजी केली ती घोषणाबाजी बेरोजगारीची होती, संविधानाला हात घालू पाहणार्‍या व्यवस्थेविरोधात होती. बेरोजगारीत होरपळणार्‍या तरुणांचा तो एक आक्रोश होता. एककलमी, एकहुकुमी हुकुमशाही विरोधातला तो आवाजही म्हणावा लागेल. खरं पाहिलं तर आजचे तरुण एवढ्या टोकाच्या भूमिका जेव्हा घेतात तेव्हा या देशाचे भविष्य काय? हा प्रश्‍न उपस्थित होतो. या प्रश्‍नाचे उत्तर वेळीच ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा छत्रपती शिवरायांचा गुरुमंत्र
सत्ताधार्‍यांनी
जोपासायला हवा. मात्र केंद्रातल्या सत्ताधार्‍यांकडून ती अपेक्षा करणे म्हणजे
सालोमालो हरिचे दास।  
म्हणऊन केला अवघा नास॥
अवघें बचमंगळ केलें। म्हणती एकाचे आपुलें।
मोडूनि संतांची वचनें। करिती आपणां भूषणें॥
स्वत:ला हरिचे दास म्हणवून सालोमालोने सगळा नाश करून ठेवला आहे. दुसर्‍याचे कवित्व आपले म्हणून सांगत अवघा गोंधळ घालून ठेवला आहे. संतांच्या वचनांची मोडतोड करून त्या कविता आपल्याच असे सांगत आहे. असे दुसर्‍याचे शब्दधन स्वत:चे म्हणून मिरविणारे पातकी आचंद्रसूर्य नरकातच खितपत पडल्याशिवाय राहणार नाहीत. असे जगद्गुरू तुकोबांचे म्हणणे आहे. असेच मंबाजीचे झिलके सालो-मालो इथेही व्यवस्थेत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत म्हणा अथवा स्वातंत्र्यापासून आजपावेत गांधींपासून ते नेहरुंपर्यंत कोणीच काही केले नाही. जे केले ते आम्हीच केले म्हणणारे आजचे तथाकथीत विश्‍वगुरू आणि त्यांचे भक्त अशा व्यवस्थेला कारणीभूत म्हणावे लागतील. संसदेत घुसखोरी करणार्‍या तरुणांना पिंजर्‍यात उभे करण्यापेक्षा त्यांच्यात ती भावना निर्माण करू पाहणार्‍या सत्ताकेंद्रांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले पाहिजे. जिथली सुरक्षा व्यवस्था भेदून हे तरुण आतमध्ये गेले त्या सुरक्षा व्यवस्थेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले पाहिजे. बीडमध्येही जे काही तरुणांनी केले त्या तरुणांवर आरोप करण्यापेक्षा त्यांना गुन्हेगार ठरवण्यापेक्षा त्यांची माथी का भडकली? त्यांच्या मस्तकातल्या अळ्या वळवळ का झाल्या? याकडे पाहिले पाहिजे. असेच जर हुकुमशाही वर्तन सत्ताकारणाचे धोरण होत असेल तर या देशाचे भवितव्य सरण कशावरून नसेल? 

Previous Post

फायनान्स कंपनीकडे बनावट सोने ठेवून 21 लाख रुपये घेतले;सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल; एक अटक

Next Post

शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाचा विवाह थाटात संपन्न

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाचा विवाह थाटात संपन्न

शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाचा विवाह थाटात संपन्न

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?