विष पिलेल्या तरुणाला बीडला घेऊन येत असताना घडली घटना
अपघातातील दोन्ही वाहने चक्काचूर
पहाटे तीन वाजता पोखरी फाट्यावर घडली घटना
बीड (रिपोर्टर): विष पिलेल्या एका तरुणाला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन येत असताना स्विफ्ट डिझायर आणि ट्रॅक्टरची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात स्विफ्टमधील आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला तर विषारी औषध प्राशन केलेला तरुण व त्याची आई जखमी झाले. ही घटना पहाटे तीन वाजता पोखरी फाट्यावर घडली. अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरच्या हेडचे दोन तुकडे झाले व स्विफ्ट गाडीही चक्काचूर झाली.

नितीन सुभाष वेताळ (वय 18 वर्षे, रा. उपळी ता. वडवणी) हा तरुण रात्री विषारी औषध पिला. त्याला उपचारार्थ बीडमध्ये स्विफ्ट गाडी (एम.एच. 02 डी.जे. 9391) यामध्ये घेऊन येत असताना पोखरी फाट्यावर स्विफ्ट गाडी आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रदीप केशव पवार (वय 22 वर्षे) व त्याची आई रतन केशव पवार (वय 45 वर्षे) हे दोघेही ठार झाले तर नितीन सुभाष वेताळ (वय 18) व त्याची आई अनुसया सुभाष वेताळ हे दोघे जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरच्या हेडचे दोन तुकडे झाले. स्विफ्ट गाडीचाही चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने काही अंतरावर जावून पडले होते. या प्रकरणी सदरील पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.











