बीड (रिपोर्टर)ः- घोसापूरी ग्रामपंचायत अंतर्गत 14 व्या वित्त आयोगाची कामे झाली होती. या कामाची रॉयल्टी शासनाकडे भरायला हवी होती. मात्र ती न भरता परस्पर हडप करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या बाबत गटविकास अधिकारी यांनी दखल घेत संबधीताविरोधात तक्रार दाखल केली. त्यानूसार तत्कालीन सरपंचासह मयत ग्रामसेवकाविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2017 ते 2021 या दरम्यान घोसापूरी ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामनिधी 14 व्या वित्त आयोगाच्या योजनेमधून कामाची रॉयल्टी कपात करण्यात आली होती. त्याची रक्कम 2 लाख 60 हजार 62 रुपये इतकी होती. हे पैसे शासनाकडे वर्ग करणे गरजेचे होते. मात्र सबंधीत सरपंच व ग्रामसेवकांनी पैसे परस्पर हडप केले. हा प्रकार आता उघडकीस आल्यानंतर गटविकासअधिकारी उदयसिंह वसंतराव साळुंके यांनी बीड ग्रामीण पोलीसांनी फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन सरपंच रामराव वामन बांड व मयत ग्रामसेवक दिनकर हिराजी सानप यांच्या विरोधात 406, 409, 420,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.