Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपांगरीच्या इंदू ‘वहिनी’ यांचे निधन

पांगरीच्या इंदू ‘वहिनी’ यांचे निधन


बीड (रिपोर्टर)- खापर पांगरी येथील इंदुबाई रामराव कुलकर्णी (पांगरीकर) यांचे रात्री दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. त्यांच्या निधनाने खापर पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदुबाई या खापर पांगरी येथे वहिनी या नावाने सर्वत्र परिचीत होत्या. अनेक वर्षे त्या खापर पांगरी येथे वास्तव्यास होत्या. सध्या त्या बीड शहरामध्ये राहत होत्या. गावातील लोकांच्या नेहमीच त्या मदतीला धावून येत असत. रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात मोठा परिवार आहे. पांगरीकर कुटुंबिच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

error: Content is protected !!