बीड (रिपोर्टर): बहुचर्चीत, बहुप्रतिक्षीत असलेल्या रिपोर्टर प्रीमियर लिग सिझन 6 2024 साठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिवस 30 डिसेंबर असून उद्यापर्यंतच इच्छुक क्रिकेट संघातील खेळाडूंना आपआपले अर्ज दाखल करता येणार आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून बीडसह मराठवाड्यातील खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळवून देणार्या रिपोर्टर क्रीडा अकॅडमीच्या वतीने यावर्षीही रिपोर्टर प्रिमीयर लिग सिझन 6 2024 खेळविला जाणार असून यासाठी खेळाडू नावनोंदणी करत आहेत. क्रिकेट खेळाडुंना नाव नोंदणी उद्या 30 डिसेंबर 2023 पर्यंत करता येणार आहे. येत्या 36 तासात इच्छुकांनी आपआपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन रिपोर्टर क्रिडा अकॅडमीच्या वतीने करण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सय्यद रेहान (मो. 9766664923), फैज देशमुख (7020142856) या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा सायं. दैनिक बीड रिपोर्टर कार्यालयाशी संपर्क करून नावनोंदणी करावी.