बीड (रिपोर्टर): ज्ञानराधा पतसंस्थेचे पैसे स्वतःच्या उद्योगासाठी व फायद्यासाठी वापरून करोडो रुपयांचा अपहार करणार्या कुटे ग्रुप ने स्वतःचा अपहार झाकण्यासाठी सर्व पक्षीय पुढार्यांच्या दाराचे उंबरे झिजवण्या पेक्षा गोर गरीब जनतेचे कष्टाचे व घामाचे पैसे तात्काळ अगोदर द्यावे
कुटे ग्रुप गोरगरीब जनतेचे पैसे स्वतःच्या घशात घालून ते पचविण्या साठी व स्वतःला वाचविण्यासाठी राज्यातील व देशातील मोठ मोठ्या पुढार्यांच्या दाराचे उंबरे झिजवत आहेत यामाघे फक्त ते स्वतःला वाचविण्याचां प्रयत्न करत आहेत यापेक्षा जनतेचे पैसे देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा पुढार्यांच्या पाया पडून ठेवीदारा वर दबाव आणून आपला हेतू कसा साध्य होईल एवढेच ते बघत आहे पण शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष हे साध्य होऊ देणार नाही व गोरगरीब जनतेला त्यांचे पैसे मिळे प्रयत्न शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रसिध्दी पत्रकान्वये शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी दिला
कुटे ग्रुप ने व संचालक मंडळाने स्वतःच्या उद्योगासाठी पत संस्था चे पैसे गुंतवणूक करून ठेवीदारांची शुद्ध फसवणूक केली आहे
प्रत्येक वर्षाच्या 30 सप्टेंबर ला नफा तोटा पत्रक, ताळेबंद, ऑडिट रिपोर्ट, वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करावा लागतो तो त्यांनी आता पर्यंत कधीच केलेला नाही अध्यक्ष व संचालक मंडळाने
पत संस्था चे व ठेवीदारांचे पैसे स्वतःच्या उद्योगासाठी साठी बोगस व निनावी कर्ज प्रकरणे दाखवून ते पैसे स्वतःच्या फायद्या साठी वापरले तसेच संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाना संस्थेची मालमत्ता विक्रीचे अधिकार नसताना तरीही ते विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत या बाबत पतसंस्थेचे स्वतंत्र लेखा परीक्षण करून तात्काळ अध्यक्ष व संचालक मंडळा वर गुन्हे दाखल करावे नसता शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईलअसा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी दिला.