अज्ञात चार दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल
महासांगवी शिवारात घडली घटना
बीड (रिपोर्टर): पुण्याहून बीडकडे येत असताना महासांगवी शिवारात चार अज्ञात दरोडेखोरांनी ऊसतोड मुकादम हुले यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील सोन्याचे लॉकेट व नगदी रक्कम असा एकूण 5 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पाटोदा पोलिसात अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तात्याराम दगडु हुले (रा. ढालेवाडी ता. पाटोदा) हे पुणे येथे ऊसतोड मजुरांच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी बैठक आयोजीत करण्यात आली होती त्या ठिकाणी गेले होते. बैठक आटोपून ते पाटोदा या ठिकाणी साकतमार्गे येत असताना महासांगवी शिवारातील दिलीप कांकरीया यांच्या शेताजवळ अज्ञात चार चोरट्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील शंभर ग्रॅम वजनाचे लॉकेट व रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपये लुटले. या प्रकरणी हुले यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











