बीड (रिपोर्टर) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अधिकार्यांची माहिती आयोगाने जिल्हा परिषद प्रशासन आणि महसूल विभागाकडून मागवलेली आहे. यामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्ह्याचे रहिवासी असलेले दोन डेप्युटी सीईओ आणि दोन बीडीओंच्या बदल्या होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक मुंडे महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, केज येथील गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे आणि परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केंद्रे यांनी जिल्ह्यात तीन वर्षापर्यंतचा कार्यकाळ उभोगलेला आहे अन् ते जिल्ह्याचेच रहिवासी असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला कळविलेली आहे. त्याअनुषंगाने येत्या 15 दिवसांमध्ये या चार अधिकार्यांसह इतरही अधिकार्यांच्या बदल्या येत्या 15 दिवसात होतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. तसेच महसूल विभागाचीही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून लवकरच याबाबत निवडणूक आयोगाला तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आणि जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या महसूल विभागाच्या वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या कर्मचार्यांची माहिती आयोगाला देण्यात येणार आहे.