Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकरिअरलोणी शाहजानपूरची श्रध्दा आयईएस परिक्षेत देशात 36 वीे

लोणी शाहजानपूरची श्रध्दा आयईएस परिक्षेत देशात 36 वीे


बीड (रिपोर्टर)- युपीएससी घेत असलेल्या आयईएस इंजिनीअरींग परिक्षेत देशभरातून 36 व्या रँकने यशस्वी ठरलेल्या बीड तालुक्यातील लोणी शाहजानपूर येथील श्रध्दा नवनाथ शिंदे हिचे सर्वस्त्र कौतुक होत असून हिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. शेतकरी कुटूबांत जन्मलेल्या श्रध्दाने दहावी बारावी इयत्तेत प्रथम श्रेणी मिळवली होती. त्यानंतर 2018 साली इंजिनिअरींगची डिग्री पुर्ण झाल्यानंतर युपीएससीअंतर्गत आयईएस परिक्षेची तयारी सुरू केली होती. पहिल्याच प्रयत्नात तिने देशातून 36 वी रँक मिळवून यश प्राप्त केले आहे.


बीड तालुक्यातील लोणी शाहजानपूर येथील नवनाथ शिंदे या शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतलेल्या श्रध्दा नवनाथ शिंदे हिचे हे यश परिसरातील आणि जिल्ह्यातील विद्यार्थीनीसाठी अधिक महत्वाचे ठरते. श्रध्दा हिने सुरूवातीपासून आपलं लक्ष आयईएसकडे केंद्रीत केलं होतं. युपीएससी घेत असलेल्या आयईएस इंजिनीअरींग परिक्षेसाठी तिला पहिल्याच प्रयत्नात आलेल्या यशाने तिची मेहनत आणि कष्ठ यातून दिसून येते. श्रध्दा हिचे प्राथमीक आणि माध्यमीक शिक्षण हे बीड येथे झाले आहे. 2018 साली इंजिनिअरींगची ड्रिग्री पुर्ण झाल्यानंतर तिने युपीएससी अंतर्गत इंजिनिअरींग सर्व्हीसेस आयईएस परिक्षेची तयारी सुरू केली. 2020 च्या परिक्षेमध्ये तिने पहिल्याच प्रयत्नात देशातून 36 वा नंबर मिळवला. तिच्या या यशाबद्दल श्रध्दाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. काल लोणी शाहजनापूर येथे गावकर्‍यांनी तिचा सन्मान सोहळा ठेवला. यावेळी गावातील अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देवून, पेढा भरून तिचे अभिनंदन केले.

Most Popular

error: Content is protected !!