नगर-आळंदी येथे नेवून केला अत्याचार
गेवराई तालुक्यातील खळबळ जनक घटना
बीड, (रिपोर्टर)ः- इयत्ता 9 वर्गात शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन मुलीस रिक्षामध्ये बसवून नेत नगर आणि आळंदी या ठिकाणी अत्याचार केल्याचा खळबळ जनक प्रकार गेवराई तालुक्यातील मांडुळ येथे घडला. या प्रकरणी आरोपी विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पिडीतेचे आई वडील ऊसतोडणीला गेलेले आहेत. पिडीता आणि तिचा भाऊ दोघेच गावाकडे राहत होते.
पोवळाचीवाडी येथील महेश अर्जुन दरेकर याची मांडुळ येथील एका 9 वर्गात शिक्षण घेणार्या मुली सोबत ओळख झाली होती. सदरील रिक्षा चालकाने मुलीस आपल्या रिक्षात बसवून नगर आणि आळंदी येथे नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या पिडीत मुलीचे आई वडील ऊसतोडणीला गेल्यामुळे ही मुलगी आपल्या भावासोबत गावी राहत आहे. आपली बहिण दोन दिवसापासुन घरी आली नाही याची माहिती भावाने आई – वडीलांना दिल्यानंतर तिचा शोध घेणे सुरू केले. मात्र दोन दिवसांनी महेश दरेकर हा या मुलीस घेवून आला. पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी रिक्षा चालका विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.