बीड (रिपोर्टर): मराठा आरक्षणाच्या प्रश्नी राज्यभरामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अनेक सभा घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. राज्य सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वस्तरातून होतआहे. आज आरक्षणासंदर्भात छावा संघटनेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्यावा या मागणीसाठी छावा संघटनेने आज एकदिवसीय लाक्षणीक उपोषण केले. या वेळी संघटनेचे गंगाधर काळकुटे, युवराज मस्के यांच्यासह आदींची उपस्थिती होती.