Friday, January 28, 2022
No menu items!
Homeसंपादकीयभारतीय संस्कार संस्कृतीला विकृती,अश्‍लिलतेचा सोशल टच

भारतीय संस्कार संस्कृतीला विकृती,अश्‍लिलतेचा सोशल टच

पॉर्नच्या माध्यमातून हिंसक घटना घडत आहे, जे लोक नेहमीच पॉर्न पाहतात. त्यांच्या मानसीकतेवर वेगळा परिणाम झालेला असतो, असं मानसशास्त्राचं मत आहे. खुनाच्या ज्या काही घटना घडतात. त्यातील सत्तर टक्यापेक्षा जास्त घटना ह्या अनैतिक संबंधातूनच घडत असतात. अश्‍लितेमुळेच अनैतिक संबंध वाढले. अनैतिक संबंध इतके वाढले त्याला वयाची आणि नात्याची मर्यादा राहिली नाही. मुलांच्या बाबतीत प्रत्येक पालकांनी जागृक असणं गरजेचं आहे.

माणसाच्या जीवनात अनेक घडामोडी घडत असतात. माणुस कसा असला पाहिजे, यावर रोजच चिंतन होत असतं. माणुस चांगला असेल तर जग सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. माणुस वाईट असेल तर त्याचे परिणाम समाजात दिसून येत असतात. माणसाला चांगलं होण्यासाठी अनेक अग्निदिव्यातून जावं लागतं हे ही तितकचं खरं आहे. माणसाचे गुण आणि दुर्गुण याची चर्चा होत असते. माणसाची बुध्दी जन्मता सुपीक नसते. त्याला सुपीकता निर्माण करावी लागते. जशी बुध्दी जन्मता सुपीक नसते तशी ती विकृत ही नसते. चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टीची सुरुवात हळूहळू होत असते. कुणी कोणत्या गोष्टी स्विकाराव्यात हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं, पण एक गोष्ट निश्‍चीत आहे. ज्या व्यक्तीला जसा सहवास लाभतो, त्यानूसार ती व्यक्ती तसी वागते. काही माणसात विकृतपणा आहे, विकृतपणामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. आजचं जग हे विकासाचं मानलं जात आहे. भौतिक सुख माणसाच्या अंगा खांद्यावर लोळत आहे. भौतिक सुखाच्या आधीन माणुस इतका वाहून गेला की,त्याला अवती, भवती नेमकं काय चाललं याची तितकी जाण नसते, तो एकलकोंडा झाला. त्याच्या भोवती तंत्रज्ञानाने इतका घट्ट विळखा घातला की, त्यात तो पुर्णंता गुरफटून गेला. माणसाच्या हाती नवं तंत्रज्ञान आल्याने त्याचा तो चांगला उपयोग करण्याऐवजी वाईटच करु लागला. गेल्या पंधरा वर्षापासून सोशल मीडीया नावाचा प्रकार सुरु झाला. त्यामुळे अवघं जग माणसाच्या मुठीत असल्यासारखं आहे. सोशल मीडीयाचा वापर करतांना तरुणाईला भान राहिलं नाही. नको ते प्रकार सोशल मीडीयामुळे होवू लागले. त्यात कित्येकांचे आयुष्य उध्दवस्त होत आहे. मग त्यात कौटुंबिक कलह असेल किंवा समाजीक विध्वंस असेल. एखादं ‘हत्यार’ माणसाच्या हातात असेल,तर त्याचा वापर कसा करायचा त्याचं चांगलं ज्ञान त्याला नसेल तर चांगल्या पेक्षा वाईटच होणार हे ठरलेलं आहे.


पॉर्न पाहणारांची संख्या
अश्‍लिलता आज वाढली. ज्या गोष्टी बंद कमर्‍यात करायाच्या असतात. त्या रस्त्यावर दिसू लागल्या. त्याचा बाजार मांडला गेला. नको असलेलं समोर दिसू लागलं. त्यामुळे त्याचा परिणाम समाज जीवनावर होवू लागला. अश्‍लिल चित्रपट पुर्वी नव्हते. मात्र वीस वर्षापासून त्याला सुरुवात झाली. आता तर स्मार्ट फोनमुळे प्रत्येकाला ‘ते’ चित्रपट पाहता येतात. अश्‍लिल चित्रपटाचा प्रचंड प्रमाणात सुळसुळात वाढला. पॉर्न चित्रपटामुळे तरुणाईवर वाईट परिणाम होतात. काही देशात यावर बंदी असली तरी त्याचा चोरुन वापर केला जातो. जगात सर्वात जास्त अमेरिकेत पॉर्न चित्रपट पाहितले जातात. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो युकेचा, आणि लॉकडाऊन नंतर तिसरा क्रमांक लागतो तो भारताचा. पुर्वी भारताचा क्रमांक पाचवा होता. जगात 33 टक्के लोक पॉर्न पाहत होते, लॉकडाऊन नंतर त्याचा वापर दुपटीने वाढून 58 टक्कयापर्यंत गेला. पॉर्न पाहणार्‍यामध्ये 18 ते 65 वयोगट आहे. भारतात पॉर्नवर बंदी घालण्यात आली होती, मात्र त्याचा वापर अनाधिकृतपणे होत आहे. एखादी गोष्ट बॅन करण्यात आली असली तरी त्याचा वापर अनाधिकृतपणे करणारे कमी नसतात. मध्यंतरी राज कुंद्रा याच्यावर पॉर्न प्रकरणी गुन्हे दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. कुद्रा सारखे अनेक महाभाग असतील पण त्यांच्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. पॉर्नच्या बाबतीत कठोर कारवाई व्हायला हवी. मात्र आपली शासन व्यवस्था तितकी सक्षम नसते, हे दुर्देव म्हणावं लागेल.


विकृतीचा कळस
सोशल मीडीया कसा हाताळावा याचं ज्ञान नसल्यामुळे त्याचा सर्रापणे गैरवापर होवू लागला. राजकीय मंडळीने आपल्या सोयीसाठी अनेकांना पेड म्हणुन कामाला लावलेलं आहे. आपल्या विरोधात कुणी काही बोललं की, पेड असणारे लोक त्यावर तुटून पडतात. त्यातून विचार व्यक्त होण्या ऐवजी शिव्या, धमक्या, अश्‍लिल कमेंट व्यक्त होत आहे. विचाराची लढाई ही विचारातून लढली पाहिजे. तसं न होता. विकृतीचा सैराचार वाढला. काही जण सोशल मीडीयाचा वापर लोकांना बदनाम करण्यासाठी करतात. काही तरी वेगळं अ‍ॅप बनवायचं आणि त्यावर अश्‍लिलता वाहत ठेवायची, नुकत्याच एका अ‍ॅपचा भांडाफोड झाला. विशीष्ट समाजाच्या महिलांना जाणीवपुर्वक टार्गेट करण्याच्या उद्देशाने महिलांच्या फोटोचा गैरवापर करण्यात आला. अ‍ॅपद्वारे त्यांची चक्क बोली लावली जात होती. ह्या महिला विविध क्षेत्रात चांगलं काम करणार्‍या आहेत. विशेष करुन आपल्या अधिकारासाठी त्या आवाज उठवणार्‍या आहेत. त्यांच्या फोटोचा असा गैरवापर करुन संबंधीताने आपल्या विकृत बुध्दीचं प्रदर्शन घडवलं. याप्रकरणी पोलिसांनी तीघांना अटक केली. या तिघांचे वय पंचवीसीच्या आतीलच आहे. यात एका मुलीचा सहभाग आहे, हे तिघे पकडण्यात आले, पण त्यांचा खरा मोरक्या कोण आहे, याचा अद्याप शोध लागला नाही. हाच प्रकार या तिघांच्या घरातील महिलांच्या बाबतीत कुणी केला असता तर? काही भामटे ऑनलाईन गंडा घालतात. अशा प्रकरणात आरोपी विरोधात शक्यतो कारवाई होत नाही. ऑनलाईन गंडा घालणारे कुठले तरी इतर राज्यातील असतात. व्हीडीओ कॉलींगद्वारे अश्‍लिलता वाढली. काहींंचा तो एक व्यवसायच झाला. व्हीडीओ कॉलींगला भळभळणारे थोडा ही विचार करत नाही, ते समोरची व्यक्ती जसं म्हणेल तसं करुन स्वत:ची अबु्र व्हीडीओमध्ये दिसते याचा विचार करत नाही. नंतर त्यांच्यावर रडण्याची वेळ येते. दुसर्‍याबद्दल सोशल मीडीयावर काय बनवता,याचा विचार बनवणार्‍यांनी केला पाहिजे? डोक्यात चांगल्या विचारापेक्षा किती वाईट भरलेलं असतं ते अशा घटनातून दिसून येतं. काही जण जातीय, धार्मिक भावना भडकवणारे पोस्ट टाकतात. विचित्र व्हीडीओ बनवतात. त्यातून सामाजीक तेढ निर्माण होतात. गेल्या पाच वर्षात समाजीक तेढ निर्माण होईल असाच प्रयत्न जाणीवपुर्वक करण्यात आलेला आहे. वादग्रस्त राजकारणी व धार्मिक लोक भावना भडकवणारे वक्तव्य करत असतात. त्यांचे वक्तव्य सोशल मीडीयावर जास्त प्रमाणात व्हायरल केले जात असतात. सोशल मीडीया ही एक महाप्रचंड डोकेदुखी होवून बसली आहे.


किती ही अश्‍लिलता
चित्रपटासह, जाहीरातीमध्ये महिला, मुली असतात. महिलांनी कशा पध्दतीने चित्रपटात काम करावं यावर काही बंधन राहिले नाहीत. पुर्वी होते, आज नाहीत. खाजगी कंपनीच्या जाहिरातीत नको ते दाखवलं जावू लागलं. जाहीरातीत किती अश्‍लीलता असावी याचा विचार केला पाहिजे? काही जाहीराती इतक्या विकृत बनवल्या जातात की, त्याची किळस येते. घरातील मंडळीने एकत्रीत बसून चित्रपट, मालिका बघावी असं काही राहिलं नाही. चित्रपटातील अनेक नटीचं वर्तन आणि हावभाव संस्कृतीला शोभणारे असतात का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे काही करायचं असतं का? नटीने पुर्णंता कपडे घालावे असा चित्रपटत येतच नाही. जितके कमी कपडे असतील तितका चित्रपटाला जास्त फायदा होवू लागला, हा एक टे्रडच झाला आहे. फेसबुकवरही अश्‍लिलता वाहत असते. काही मॉडेलचं आणि इतर महिलांचे अश्‍लिल फोटो असतात. त्यातून संबंधीतांना पैसे मिळतात. पैशासाठी वाट्टेल ते केलं जातं. लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावा की नाही असचं झालं आहे. इंटरनेटचा वापर करणारांची संख्या वाढली. लहान मुल जेव्हा मोबाईल हातात घेतात. तेव्हा त्यांच्या नजरेत मोबाईल मधील अश्‍लितेचं दर्शन होवू लागलं. नवीन पिढी बिघडत आहे, त्याला कारण हे इंटरनेट ठरु लागलं. पुर्वी पॉर्न पाहण्याचं एक विशीष्ट वय होतं. आता त्याला काही मर्यादा राहिल्या नाहीत. लहान मुलं ही पॉर्न साईड उघडू लागले आहेत. पॉर्नच्या माध्यमातून हिंसक घटना घडत आहे, जे लोक नेहमीच पॉर्न पाहतात. त्यांच्या मानसीकतेवर वेगळा परिणाम झालेला असतो, असं मानसशास्त्राचं मत आहे. खुनाच्या ज्या काही घटना घडतात. त्यातील सत्तर टक्यापेक्षा जास्त घटना ह्या अनैतिक संबंधातूनच घडत असतात. अश्‍लितेमुळेच अनैतिक संबंध वाढले. अनैतिक संबंध इतके वाढले त्याला वयाची आणि नात्याची मर्यादा राहिली नाही. मुलांच्या बाबतीत प्रत्येक पालकांनी जागृक असणं गरजेचं आहे. बहुतांश पालक आपल्या मुलाकडे लक्षच देत नाहीत. लहान वयात अश्‍लिलता आणि वाईट गोष्टीच्या सहवासात मुलं आले तर भविष्यात मुलांवर त्याचे वाईट परिणाम होवून मुलं बिघडतात. त्यासाठी पालकांनी आजच्या समाज जीवनाचं भान ठेवून त्या नूसार मुलांवर संस्कार केले पाहिजे. पिढ्या चारित्र्यसंपन्न बनवण्यासाठी विचाराचं आणि भावनाचं संपुर्ण प्रशिक्षण अंत्यंत आवश्यक आहे. माणसाने आपल्या जीवनात शिस्तबध्द पध्दतीने चांगल्या वर्तनाचा अवलंब करणं हेच चारित्र्यसंपन्नतेचं गमक आहे. चांगला समाज घडवण्यासाठी चांगल्या विचाराची आज गरज आहे.

Most Popular

error: Content is protected !!