Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाअंबाजोगाईसह बीड तालुक्यात रूग्णसंख्या वाढू लागली

अंबाजोगाईसह बीड तालुक्यात रूग्णसंख्या वाढू लागली

बीड (रिपोर्टर) कोरोनाच्या रूग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होवू लागली. बीड जिल्ह्यातही रूग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात 45 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई 16 आणि बीड तालुकयात 6 रूग्ण आढळले आहेत.
कोरोना रूग्णांची संख्या राज्यभरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्ह्यातही रूग्ण वाढू लागले. आरोग्य विभागाने 2033 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये 45 रूग्ण पॉझिटिव्ह निघाले. 1988 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये सर्वात जास्त 16 रूग्ण आढळले आहेत. आष्टी 4, बीड 6, गेवराई 2, केज 5, माजलगाव 4, परळी 5, पाटोद्यामध्ये 3 रूग्ण आढळले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!