पारधी समाजाच्या महिलांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
बीड, (रिपोर्टर)ः- शहरामध्ये काही ठिकाणी वाहतुकचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलिसांनी काही भागात वाहतुक हटवण्यासाठी चक्क रस्त्यावर गोर गरीब विक्रेत्यांना त्रास दिला. पारधी समाजाच्या महिला फुगे विकत होत्या. त्यांचे फुगे फोडून साहित्याची नासधुस केली. या प्रकाराने सदरील व्यवसायीकात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांना इतराचे अतीक्रमण दिसत नाही. मात्र गोर गरीबांवरच कारवाई आणि दंडेल शाही का असा प्रश्न शिलाबाई शिंदे यांनी उपस्थित केला असुन दोषी विरोधात कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
काल पोलिसांनी शहरातील काही भागात फिरून वाहतुक हटवली. यावेळी रस्त्यावर फुगे विकणार्या महिलांना त्यांनी जाणीव पुर्वक त्रास दिला. शिलाबाई गणपत शिंदे (रा.वासनवाडी शिवार) ही महिला फुगे विक्री करत होती. हिचे फुगे फोडून साहित्याची नासधुस केली. पोलिसांनी अतिक्रमण जरूर हटवाले. मात्र अशा पध्दतीने हटवू नये. धन दांडग्यांनी व इतर व्यवसायीकांनी रस्त्यावर अतिक्रमण थाटले. अधी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिलाबाई शिंदे, शिवाजी पवार, शंकर पवार, दत्ता शिंदे, साखरबाई शिंदे, गणपत शिंदे, दत्ता काळे, लक्ष्मी पवार, सुनिल शिंदे, लता काळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.