बीड, (रिपोर्टर)ः- ऊसतोडणीसाठी मजुर पुरवितोत असं म्हणुन एका गाडी चालकांकडून 11 लाख 66 हजार रूपये घेण्यात आले होते. पैसे घेवूनही मजुरांचा पुरवठा करण्यात आला नाही. उलट चालकांस शिवीगाळ करून धमकविण्यात आले आहे. या प्रकरणी 7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक बाळाभाऊ शेंडगे (रा.नाळवंडी नाका राजु नगर बीड) यांच्यासोबत अजित किशन पवार व इतरांनी मजुर पुरविण्यासाठी शेंडगे यांच्याकडून 11 लाख 66 हजार रूपये घेण्यात आले होते. पैसे घेवूनही त्यांना मजुर पुरविण्यात आले नाही. शेंडगे यांनी पैशाची मागणी केली असता त्यांना अजय किसन पवार व गजानन किसन पवार या दोघांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी अशोक शेंडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय पवार, गजानन पवार, देवा पवार, सचिन पवार, किसन पवार, त्रीशला पवार, अभिषेक रेडे (रा. मिलिद नगर, नेहकर जि. बुलढाणा) यांच्या विरोधात पेठ बीड पोलिस ठाण्यात कलम 420, 504, 34 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.