Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात बाधितांची संख्या शंभरीकडे

जिल्ह्यात बाधितांची संख्या शंभरीकडे

बीड (रिपोर्टर)- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात वाढताना दिसून येत असून आज जिल्हाभरात तब्बल 64 नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने बाधितांची संख्या शंभरीकडे वाटचाल करीत आहे.
   जिल्ह्यात एकूण 1 हजार 351 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता आज सकाळी आलेल्या अहवालात 1 हजार 295 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 64 जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये अंबाजोगाई 18, आष्टी 5, बीड 12, धारूर 2, गेवराई 5, केज 6, माजलगाव 4, परळी 11 आणि वडवणी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात उपचार घेणार्‍यांची संख्या 317 वर जाऊन पोहचली आहे.

Most Popular

error: Content is protected !!