Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडधारूरआधी मराठी शाळा वाचवा, नंतर पाट्यांचा पुळका दाखवा

आधी मराठी शाळा वाचवा, नंतर पाट्यांचा पुळका दाखवा


किल्लेधारूर (नाथा ढगे)

महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये लावाव्यात असा अध्यादेश काढला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत निर्णय देखील झाला आहे परंतु कात टाकत असलेल्या मराठी शाळांचे काय मराठी शाळेतील कर्मचारी विनाअनुदानित तत्त्वावर वर्षं वर्ष काम करत आहेत त्याचे काय अनेक वर्षापासून त्यांना अनुदान नाही त्याचे काय आहे याबाबत मात्र शासन कुठलाही निर्णय घेताना दिसून येत नाही यातून मराठी शाळा महाराष्ट्रातील या महाविकास आघाडी सरकारला जगवायची आहेत की नाही असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.


परंतु आम्हाला मराठीचा पुळका आहे एवढे मात्र दाखवलं जातं की छोट्या-मोठ्या दुकानांच्या पाट्या आता मराठीत लावा यातून माय मराठी विषयी शासनाला मोठा पुळका आल्याचे दिसून येत आहे परंतु ज्या मराठी शाळा कात टाकत आहेत सलाईनवर आहेत अशा शाळांना जीवनदान देण्यासाठी कुठलीही उपाययोजना शासन करताना दिसून येत नाहीये. विनाअनुदानित शाळांना अनुदान देऊन त्यांना भरगच्च निधी देऊन पुन्हा एकदा मराठी शाळा नावारुपाला येतील असा प्रयत्न शासनाने करायला हवा परंतु असे न होता महाराष्ट्रा मध्ये इंग्रजी शाळांना उत्तेजन देण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे की काय असे आता वाटत आहे. बेसुमार इंग्रजी शाळा कंपनीवाले मोठे भले गच्ची भांडवल वाले यांना दिल्या जात आहेत. यातून मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा मराठी शाळा महाराष्ट्राची अस्मिता जपणे गरजेचे आहे. यामुळे शासनाने त्वरित मराठी शाळेला प्रोत्साहन द्यावे ज्या काही शाळा विनाअनुदानित तत्त्वावर सुरू आहेत असे शाळेला अनुदान देऊन मराठीची अस्मिता जोपासण्याचे काम करावं.

मराठी शाळा दिवसेंदिवस बिकट अवस्थेतून जात आहेत यशाला निधीअभावी सलाईनवर आहेत काही शाळा तर बंद झाल्या आहेत तर काही शाळा आणखी ही कात टाकताना दिसून येत आहेत विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी हे हॉटेलवर तसेच बांधकाम मावर मजूर म्हणून काम करताना दिसून येत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील मराठी शाळांना जीवन दान द्यावे त्यांना निधी देऊन पुन्हा एकदा मराठी शाळांची अस्मिता जपावी.

  • नाथा ढगे (जिल्हाध्यक्ष मराठी शाळा शिक्षक संघटना बीड)

महविकास आघाडी सरकार माराठी मुद्यावर सत्तेवर आले आहे परंतू माराठी माणूसच मेटाकुटीला आला आहे मी एक विनाअनुदानीत शिक्षक असुन गेली १० वर्षापासून ज्ञान दानाचे काम करत आहे मला एक ही रुपया पागर दिला जात नाही माझा उदरनिर्वाह कसा करु असा मोठा प्रश्न माझ्या सामोर उभा ठाकला आहे.

  • एक विनाअनुदानीत शिक्षक धारूर

Most Popular

error: Content is protected !!