बीड (रिपोर्टर): दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मदरसा दारुल-उलूम-बीड येथे 16 विद्यार्थ्यांनी पवित्र कुरआन मुखोदत पाठ केले आहे. या निमित्ताने 11 जानेवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता मदरशातील मस्जिद अबुबकर येथे एका आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुफी परंपरेतील महान संत हजरत मौलाना मुनीर अहेमद साहेब (कालिनावाले, मुंबई) यांचे आगमन होणार आहे. या निमित्ताने त्यांचे विशेष मार्गदर्शन व दुवा होणार आहे, तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मदरसा दारुल उलूमच्या वतीने करण्यात आले आहे.