Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeकोरोनाशाळा, महाविद्यालये सुरू करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कूल चले हम आंदोलन

शाळा, महाविद्यालये सुरू करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कूल चले हम आंदोलन


बीड (रिपोर्टर) सततच्या शाळा बंद मुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दिकतेवर परिणाम होत असून राज्य शासनाने नियमाचे पालन करून शाळा सुरू कराव्यात. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कूल चले हम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्याचा सहभाग होता.

कोविड रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा शाळा सुरू कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कूल चले हम आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.गणेश ढवळे, मनोज जाधव, युनूस चराटकर, प्रा.हनुमंत भोसले, प्रा.राऊत ज्ञानेश्‍वर, संदिप जाधव, मोहम्मद मोहिजोद्दीन, सय्यद आबेद, शेख मोबीन, हनुमान मुळीक, विजय पवारसह आदिंची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!