बीड (रिपोर्टर): रनहिट कायदा रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी नेकनूर येथे मोटार मालक-चालक संघटनेच्या वतीने बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती तर बीड येथील चालक-मालक संघटनेनेही जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंठद्र सरकारने मोटारवाहतूक संदर्भातला कायदा केलेला आहे. हा कायदा जाचक असून सदरील कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी चालक-मालक संघटनेच्या वतीने होत आहे. आज नेकनूर येथील चालक-मालक संघटनेने बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन फेरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी राजाभैय्या, नदीम मंडोला, सय्यद रिजवान यांच्यासह आदींची उपस्थिती होती तर बीड येथेही चालक-मालक संघटनेने जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.