बीड (रिपोर्टर): शिरूर तालुक्यातील लोणी येथे चोरीची घटना घडली असून दोन चोरट्यांनी घरातील 1 लाख 10 हजार रुपये चोरून नेले. दुसरी चोरीची घटना गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली आहे. या दोन्ही चोरी प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसनदेव महादेव बडे (रा. लोणी ता. शिरूर) यांच्या घराचे कुलूप तोडून गणेश भाऊसाहेब साबळे व जावेद अब्दुल शेख या दोघांनी घरामध्ये प्रवेश करत घरातील 1 लाख 10 हजार रुपये चोरूननेले. या प्रकरणी बडे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी चोरीची घटना गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली. भीमराव लिंबाजी जाधव यांची पत्नी शेतात गेल्याने अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील नगदी व इतर साहित्य असा 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











