पाटोदा (रिपोर्टर) – पंतप्रधान स्वनिधी कर्ज वाटप योजनेस दिरंगाई करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज पोटोदा येथील ’एसबीआई’बँकेच्या समोर सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली भाजीपाला विक्री आंदोलन करण्यात आले.
देशातील तरूणांना स्वावलंबी बनवुन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविण्यात येतात. येतात.समाजातील विविध घटकांना लक्षात घेऊन देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राची पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली.रस्त्यावरील विक्रेते,रस्त्याच्या कडेला असणारे स्टेशनरी दुकानदार, छोटे कारागीर यांना व्यावसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजनेंतर्गत 50 हजार रूपयांचे कर्ज बिनव्याज देत असुन एका वर्षात ही रक्कम परतफेड केली तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो.विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची गरज भासत नाही.मात्र पाटोदा येथील एसबीआय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शाखेतील अधिकारी कर्मचारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे लाभधारक यापासून वंचित असुन कर्मचार्यांच्या गलधान कारभाराला ग्राहक वैतागले असुन बँकेत चकरा मारून कंटाळले आहेत.त्यामुळे तातडीने कर्ज वाटप करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.25) गुरुवार रोजी एसबीआय बँकेसमोर भाजीपाला विक्री करत भाजीपाला विक्री आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शेख जावेद, कार्याध्यक्ष हमीद खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते दत्ता देशमाने,फौजी गणेश खाडे, सतिश गर्जे,शेख मोहसीन भाऊ, सतिश लामजे , महिला व्यावसायिक सुवर्णा भालशंकर, शेख फातिमा, इंदुबाई गायकवाड,सुशिला गायकवाड,दैवशाला गाढवे,बन्सी गायकवाड आदि सहभागी होते.











