सररकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात पोहचलं, मुंबईकडे मार्गस्थ होण्याच्या सूचना मिळताच मोर्चेकरी मुंबईकडे निघणार; आजचा मुक्काम वाशी, पुणे-मुंबई महामार्गावर मोठा बंदोस्त
लोणावळा (रिपोर्टर): लोणावळा तळमुक्कामी असलेल्या लाखो मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाला लोणावळ्यात पाठवलं आहे. संभाजीनगरचे आयुक्त आरदड हे जरांगे यांच्या सोबत चर्चा करत असून या तहाच्या बोलणीनंतर जरांगे हे मराठा समाजाला विचारून पुढील निर्णय घेणार आहेत, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आपण पाठीमागे हटणार नसल्याची भूमिका त्यांनी चर्चेआधीच सांगून टाकली. दुसरीकडे पुणे-मुंबई महामार्गावर रॅपिड अॅक्शन फोर्ससह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पुढील मुक्काम वाशी येथे असून तेथील मुक्कामाचीही पुर्ण तयारी मराठ्यांनी केली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून सराटी आंतरवलीतून निघालेला मराठा समाजाचा मोर्चा रात्री लोणावळा येथे तळमुक्कामी पोहचला. आज सकाळी तो मुंबईच्या दिशेने निघणार असून तत्पूर्वी मराठ्यांच्या तळमुक्कामीच सरकारने तहाची बोलणी सुरू केली आहे. त्यासाठी सरकारकडून संभाजीनगरचे आयुक्त आरदड यांना जरांगे यांच्याकडे पांठवला आहे. त्यांची बोलणी सुरू असून सरकारच्या शिष्टमंडळासोबत काय चर्चा झाली याची माहिती मराठा समाजाला दिल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे जरांगे यांनी चर्चेआधीच मराठ्यांसोबत बोलून उभ्या महाराष्ट्राला सांगितले आहे. दुसरीकडे मोर्चा हा ज्या रस्त्यावरून पुणे-मुंबई महामार्गावर जाणार आहे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. मराठ्यांच्या मोर्चाची धास्ती सरकारने घेतली असून मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.











