तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): गायरान जमीनीचा वाद विकोपाला गेला असता तीन जणांनी एकाच्या पत्र्याची शेडची नासधूस करत धमकावल्याचा प्रकार तांबवा येथे घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद विष्णू ओव्हाळ हे सर्वे नं. 127 गायरान जमीनीमध्ये राहत आहेत. त्याठिकाणी गोरख लांब व इतरांनी येऊन आनंद ओव्हाळ याच्याशी जमीनीच्या कारणावरून वाद निर्माण केला. त्यातच ओव्हाळ यांच्या पत्र्याच्या शेडचे नुकसान करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी आरोपी गोरख लांब, सिंधूबाई चाटे (रा. तांबवा) यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











