धारूर येथील घटना; अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): झोपेत असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार धारूर येथील खाटीक गल्ली येथे घडला आहे. सदरील प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोणी केला असावा आणि का? याचा तपास धारूर पोलीस करत आहे.
हसन हमीद शेख (रा. खाटीक गल्ली, धारूर) हे सर्वे नं. 369 येथील आपल्या घरामध्ये झोपले असता रात्रीच्या दरम्यान अज्ञात लोकांनी त्यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अंगावर डिझेल पडल्यानंतर हसन शेख हे जागे झाले तोपर्यंत अज्ञात व्यक्ती पळून गेले. या घटनेने धारूर येथे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी हसन शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांना कुठल्या कारणावरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात होता व आरोपी कोण आहेत? याचा तपास धारूर पोलीस करत आहेत.