Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमगुटखामाफिया मुळे जखडबंध तरीही गुटख्याची तस्करी कोण करतंय?

गुटखामाफिया मुळे जखडबंध तरीही गुटख्याची तस्करी कोण करतंय?


नव्या गुटखामाफियांकडून जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यात गुटख्याची सर्रास तस्करी
गोवा,बाबा गुटखा कंपनीचे लोक थेट पोलिस यंत्रणेतील अधिकार्‍यांशी बोलू लागले
गोवा,बाबा,आरएमडी,राजनिवास गुटखा काहींनी वाटून घेतला
प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक कुमावत नव्या गुटखामाफियांचे कंबरडे मोडणार काय?
जिल्हा पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यंत्रणेतील लाचखोरांना शोधणार काय?


बीड (रिपोर्टर) राज्य शासनाकडून बंदी असलेल्या गुटख्याची सर्रास बीड जिल्ह्यात तस्करी आणि विक्री होत आहे. प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमावत यांनी इथली गुटखा माफियागिरी उध्वस्त करण्याहेतू गुटखामाफिया मुळे याचे गोडावून आणि अड्यांवर छापे टाकून त्याला गजाआड केले. गेल्या दोन महिन्यापासून गुटखामाफिया मुळे हा जेलमध्ये असताना बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि विक्री कोण करतंय? हा प्रश्‍न पुन्हा उपस्थित होत असून कर्नाटक, गुजरातसह अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर गोवा,बाबा, आरएमडी, राजनिवास यासह अन्य गुटखा बीड शहरासह जिल्ह्यात मोठमोठ्या ट्रकांमधून येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार थेट गुटखा कंपनींच्या आणि येथील गुटखामाफियांच्या संगनमतातून पोलिस यंत्रणेशी लागेबांधे असल्याने जिल्ह्यात पुन्हा गुटख्याची विक्री तेवढ्याच तेजीने होत आहे. गुटखा धंद्यात पुन्हा नवे माफिये जन्माला आल्याचे यावरून दिसून येत असून त्यांना थेट पोलिस यंत्रणेतील वरिष्ट अधिकार्‍यांचाच अभय आहे का? शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या गुटखा तस्करी आणि विक्रीला जिल्हा पोलिस अधिक्षक राजा रामा स्वामी यांच्यासह प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमावत हे आळा घालतील का?
बीड जिल्ह्याला गुटखा माफियाचा विळखा पडल्याचे दिसून येते. बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, केज, धारूर, गेवराई या तालुक्यात आणि त्या तालुक्यातल्या कुठल्याही गावात कुठल्याही पान टपरीसह किराणा दुकानावर बाबा, गोवा, आरएमडी, राजनिवास पानमसाला, तंबाखूजन्य गुटखा मिळत आहे. गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमावत यांनी मुख्य गुटखा माफिया म्हणून मुळे नावाच्या ज्या माफियाकडे पाहिले जात होते त्या माफियचे अड्डे उध्वस्त करून कोट्यावधी रूपयाचा माल जप्त केला. दोन ठिकाणच्या छाप्यात त्या माफियाचे आर्थिक कंबरडे मोडत दोन ठिकाणी गुन्हे दाखल करून मुळे यास अटकही केले. गेल्या एक ते दोन महिन्यापासून ज्या माफियाकडे जिल्ह्याचा प्रमुख गुटखामाफिया म्हणून यंत्रणा पाहत होती तो दोन महिन्यापासून जेलमध्ये आहे. असे असताना बीड शहरासह जिल्ह्यातली गुटख्याची तस्करी कोण करतो? जिल्ह्यात आजही सर्रासपणे गुटख्याची विक्री होते. मग हा गुटखा बीड जिल्ह्यात येतो कुठुन? गुजरात, कर्नाटकशी आज नेमके कनेक्शन कोणाचे? शहरासह जिल्ह्यातल्या अकराही तालुक्यात गुटख्याची टंचाई का भासत नाही? गुटखा विक्री सर्रासपणे होत असताना आणि गुटखामाफिया आतमध्ये असताना गुटखा येतो कुठून? हा प्रश्‍न बीडच्या पोलिस यंत्रणेला का पडत नाही? गुटख्याच्या धंद्यात नवे माफिया घुसले आहेत का? ते जिल्हास्तरावर काम करतात की तालुकास्तरावर? हा प्रश्‍न पोलिस यंत्रणेला का पडत नाही? असे एक ना अनेक प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. रिपोर्टरला मिळालेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार गोवा,बाबा या गुटखा कंपनीचेच काही लोक थेट बीड जिल्हयातल्या यंत्रणेशी संबंध साधून बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी करत आहेत. नव्या गुटखामाफियांना हाताशी धरून बीड जिल्ह्यात रोज लाखावर गुटख्याच्या धंद्यात व्यवहार होताना दिसून येतात. तर मासिक व्यवहार सुमारे पाच ते दहा कोटीच्या घरात असल्याचे सांगितले जाते. मुळे जखडबंध असताना गुटख्याच्या धंद्यातल्या त्या नव्या पारंब्या कर्तव्यदक्ष म्हणून जिल्हाभर ओळख निर्माण करणारे कुमावत सापडतील का? आणि बीड जिल्ह्यातल्या गुटख्याचा धंदा समुळ नष्ट करतील का? असा थेट सवाल जनतेतून व्यक्त केला जात असून जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी हे या प्रकरणाची गंभीर दखल घेवून गुटखा कंपनीचे लोक यंत्रणेतल्या कुठल्या अधिकार्‍यांशी लाचखोरीचे समांगण करता? याचा शोध घेतील का?

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!