Wednesday, May 18, 2022
No menu items!
HomeUncategorizedराज्य कोरोनामुक्त व्हावे, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी काम करण्याचे आम्हाला बळ द्या,...

राज्य कोरोनामुक्त व्हावे, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी काम करण्याचे आम्हाला बळ द्या, ना. धनंजय मुंडे यांची गहिनीनाथगडावर वामनभाऊंना प्रार्थना


संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना. धनंजय मुंडे,
ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हस्ते महापूजा संपन्न
आ. बाळासाहेब आजबे, आ. रोहितदादा पवार आदींची उपस्थिती


गहिनीनाथगड (रिपोर्टर) प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथगड येथील पारंपरिक महापूजेस उपस्थित राराहणे हे भाग्याचे असून याप्रसंगी राज्य कोरोनामुक्त व्हावे, इथला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आम्हाला काम करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केली.

beed d2


संत वामनभाऊ यांच्या ४६ व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील वामनभाऊ यांच्या स्मृतिस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांचे हस्ते पारंपरिक पद्धतीने महापूजा व महा आरती करण्यात आली. यावेळी प्रथमच आ. रोहित दादा पवार हेही या सोहळ्यास उपस्थित होते. विठ्ठल महाराज यांना धनंजय मुंडे यांनी स्वतः फेटा बांधून आशीर्वाद घेतला तर गडावर प्रथमच आलेले आ. रोहित पवार यांना देखील धनंजय मुंडे यांनी स्वतः फेटा बांधून त्यांचे गडावर स्वागत केले. यावेळी कोरोना विषयक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे भाषण, कीर्तन व आशीर्वाद सोहळा न करता पारंपरिक पद्धतीने महापूजा व आरती करण्यात आली. ना. मुंडे यांच्यासह आ. रोहितदादा पवार, आ. बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे, शिवाजी महाराज नाकाडे, विश्वास नागरगोजे, गंहिणींनाथ सिरसाट, विठ्ठल अप्पा सानप, बन्सी खाडे, शिवदास शेकडे, अभिजित तांदळे यांसह आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!