• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

प्रखर-अनेतिकतेचं राजकारण

by गणेश सावंत
January 30, 2024
Reading Time: 1 min read
0
प्रखर-अनेतिकतेचं राजकारण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

भाजपाला धडा शिकवण्यासाठी ममता इंडीया आघाडीत सहभागी झाल्या होत्या. जागा वाटपाच्या आधीच त्यांनी आपली भुमिका जाहीर करुन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपली लोकसभेत ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. ममतासह ‘आप’ने पंजाब आणि हारीयानात स्वतंत्र निवडणुक लढण्याचा निर्णय घेतल्याने इंडीयाची ताकद बरीच कमी झाली. ममता आणि आप निवडणुकीनंतर पुन्हा इंडीया आघाडी सोबत राहतात की, स्वतंत्र घोडं दामटतात हे नंतरच दिसणार आहे. नितीशकुमार यांनी जो काही राजकीय डाव खेळला तो लोकांना आवडला नाही. अनेकांनी त्यांच्या विरेाधात प्रतिक्रिया दिल्या. आम्ही विकासासाठी भाजपासोबत गेलो, बिहारचा विकास करायचा होता असं ते म्हणु शकतात, मात्र त्याचं म्हणणं हे कोणालाच पटणारं नाही. नितीश याचं ’अनैतिकतेचं’ राजकारण हे भविष्यात त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं?


राजकारणातला वैचारीक मर्म संपला, राजकारण हा फक्त धंदाच झाला. तोडा, फोडा आणि राज्य करा असा प्रकार बळावला. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत फोडाफोडी केली जाते. एखादं राज्य आपल्या ताब्यात येत नाही, किंवा एखादा नेता आपल्या पक्षात येत नाही, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी सत्ताधार्‍यांची असते. ईडी, सीबीआय सारख्या संस्था देखील विरोधकांच्याच मागे लागतांना दिसतात. त्यांना विरोधकाकडे जास्तीचे पैसे, चुकीचे कामे दिसतात. सत्ताधारी सगळे सेफ दिसू लागतात.  सत्ताधारी आपण स्वच्छ असल्याचा आव आणत असतात. सत्ताधार्‍यांना विरोधकाचं पाणी गढूळ दिसून येवू लागतं. देशातील कोणत्या राज्यात कधी सत्ता परिवर्तन होईल हे सांगता येत नाही. काल एकत्रीत असणारे अचानक बदलू शकतात. त्यांच्यात राजकीय वैर निर्माण होवू शकते, दोन वर्षा पुर्वी महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थती  काय होती? आणि आज काय आहे? दोन वर्षात राज्यात अनेक राजकीय बदल  झाले. इतके बदल झाले की, त्याचा कुणी विचार केला नव्हता? पुढारी फक्त सत्तेसाठी कोलांट उड्या मारु लागले. ह्या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून ह्या पक्षात जावून सत्ता मिळवून स्तव:चा बचाव करु लागले. काहींना ईडीने जेलमध्ये टाकले. त्यांनी जेल भोगला. काहींना अजुन ईडीची भीती वाटते.  येत्या लोकसभा निवडणुकीची तयारी होवू लागली. लोकसभा निवडणुक ‘इंडीया’ आघाडी आणि एनडीएसाठी महत्वाची आहे. भाजपाने चारशे पारचा आकडा गाठण्याचे लक्ष्य ठेवले. ‘इंडीया’ने एक, एक घटक पक्ष जुळवून आघाडी तयार केली. शेवटपर्यंत किती घटक पक्ष ‘इंडीया’त राहतात हा महत्वाचा प्रश्‍न आहे.  


नितीशकुमार यांची हाद्द झाली
राजकारणात कोणी कोणासोबत जावं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो,. पण राजकारण हे नैतिक असावं असचं म्हटलं जातं. नैतिक आणि अनैतिक यातला फरक अजुनही बहुतांश पुढार्‍यांना समजला नाही असं दिसून येवू लागलं. नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा बिहारमध्ये चांगला दबदबा आहे. नितीशकुमार हे कधी पलटी मारतील याचा भरोसा नसतो. तशी त्यांची गॅरंटी कुणी देवू शकत नाही. केंद्रीय राजकारणातला चागंला चेहरा म्हणुन त्यांच्याकडे पाहितले जात होते, पण. त्यांच्या दलबदलूपणामुळे त्यांच्या प्रतिमेला तडे गेले. अठरा महिन्यापुर्वी त्यांनी भाजपासोबतची आघाडी तोडून तेजस्वी यादव यांच्या सोबत राजकीय लग्न लावले होते,. अठरा महिने संसार केल्यानंतर त्यांनी यादव यांच्याशी घटस्फोट घेतला आणि पुन्हा भाजपासोबत घरोबा केला. या घरोबाला काय नाव द्यावं हेच कळेना? बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजपाच्या नेत्यात चांगलेच शाब्दीक युध्द पेटले होते. नितीशकुमार यांना आता कधीच भाजपासोबत घेतले जाणार नाही. असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आहे. तर मेलो तरी भाजपासोबत जाणार नाही असं नितीशकुमार यांनी म्हटलेलं आहे. पण ना भाजपाने आपला शब्द पाळला ना नितीशकुमार आपल्या शब्दाला जागले. सगळं काही विसरुन दोघांनी सत्तेचा पदर धरला व नितीशकुमार नव्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या बाहुल्यावर चढले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा त्यांनी रेकॅॉर्ड केला असलं तरी इकडून तिकडे पळून पद राखणार्‍या रेकॉर्डला तितकं  महत्व नसतं.
‘इंडीया’चे समन्वय होते
काँग्रेसह इतर काही पक्षांनी मिळून इंडीया आघाडी स्थापन केली. यात नितीश कुमार यांचा सहभाग होता. नितीशकुमार हे इंडीया आघाडीचे समन्वय होते. आघाडीतील नेत्यासोबत त्यांच्या अनेक वेळा बैंठका झाल्या होत्या. जागा वाटपाबाबत चर्चा देखील झाली होती. नितीशकुमार इंडीया आघाडीत आल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून येईल असा अंदाज बांधण्यात आला होता, पण दुसरीकडे नितीश यांच्या ‘दगलबाजीची’ चर्चा सुध्दा होत होती. लोकसभा निवडणुका काही दिवसावर येवून ठेपल्या आणि नितीशकुमार यांनी धोका दिला. या धोक्यामुळे इंडीया आघाडीतील नेत्यांना खाली पाहण्याची वेळ आली. नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच जाहीर केले होते, की आता ही माझी शेवटची निवडणुक आहे. या नंतर निवडणुक लढवणार नाही. त्यांच्या अशा वर्तनावरुन ते आपल्या शब्दाला जागतील का? उत्तरप्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत हे तिन्ही राज्य महत्वाचे मानले जातात. या तिन राज्यात आपलाच दबदबा असावा असा भाजपाचा प्लॅन आहे, नितीशकुमार यांच्या भुमिकेने भाजपाचा प्लॅन यशस्वी होवू लागला. तीन्ही महत्वाच्या राज्यात भाजपाचे वर्चस्व आहे. बिहार, महाराष्ट्र या दोन राज्यात भाजपाची इतर पक्षासोबत आघाडी असली तरी आघाडीच्या नेत्यांना कसं नाचवायचं हे भाजपाला चांगलं माहित आहे. घटक पक्षांचा भाजपा वापर करुन घेत आहे हे घटक पक्षांच्या नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणच करु नये?
नितीशकुमार हे तिसरे नेते
भाजपाला म्हणजेच मोदी यांना आव्हान देणं आज तरी सोपं नाही. कोणी, मानो ना मानो, भाजपाकडे राजकारण करण्याची एक रणनिती आहे. ती इतर पक्षाकडे आज तरी दिसून येत नाही. पाच वर्ष बसायचं आणि निवडणुका आल्या की, कामाला लागलायचं असं काही पक्षाचं धोरण असतं. हे धोरण चुकीचं आहे. मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान व्हायचं आहे. त्यामुळे त्यांनी आपली पुर्ण प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. जे नाराज आहेत. त्यांची कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला जावू लागला. जे आपल्या जवळ नाहीत त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न होवू लागला. नितीश कुमार यांनी अचानक पलटी का मारली हे अजुन समजले नसले तरी त्या मागे नक्कीच काही तरी मोठं कारण असणार आहे. ज्या प्रमाणात राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीची अवस्था केली तशीच तुमची करु अशी भीती तर नितीशकुमार यांना दाखवली नाही ना? . बिहारमध्ये लालू यादव व नितीशकुमार या दोन नेत्यांची ‘चलती’ आहे. तेजस्वी यादव यांनी गत विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही. काही जाग्यांचा फरक होता. नितीशकुमार लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणखी वेगळी भुमिका घेतात की काय असं वाटू लागलं. इंडीया आघाडीतून नितीश कुमार यांच्या सारखा महत्वाचा नेता बाहेर पडल्यानंतर त्यापुर्वी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. ममता यांची भुमिका इंडीया आघाडीसाठी फायद्याची कि तोटयाची हे निवडणुकीत दिसेल. ममता यांनी आपलं राज्य स्वत:च्या हिंमतीवर राखलं. ममता ह्या पुर्वीच्या काँग्रेसच्या नेत्या, पण काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. काँग्रेसचं आणि ममता यांचं कधीच जमलं नाही. भाजपाला धडा शिकवण्यासाठी ममता इंडीया आघाडीत सहभागी झाल्या होत्या. जागा वाटपाच्या आधीच त्यांनी आपली भुमिका जाहीर करुन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपली लोकसभेत ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. ममतासह ‘आप’ने पंजाब आणि हारीयानात स्वतंत्र निवडणुक लढण्याचा निर्णय घेतल्याने इंडीयाची ताकद बरीच कमी झाली. ममता आणि आप निवडणुकीनंतर पुन्हा इंडीया आघाडी सोबत राहतात की, स्वतंत्र घोडं दामटतात हे नंतरच दिसणार आहे. नितीशकुमार यांनी जो काही राजकीय डाव खेळला तो लोकांना आवडला नाही. अनेकांनी त्यांच्या विरेाधात प्रतिक्रिया दिल्या. आम्ही विकासासाठी भाजपासोबत गेलो, बिहारचा विकास करायचा होता असं ते म्हणु शकतात, मात्र त्याचं म्हणणं हे कोणालाच पटणारं नाही. नितीश याचं ’अनैतिकतेचं’ राजकारण हे भविष्यात त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं?  

Previous Post

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा सन्मान

Next Post

प्रेम संबंधातून 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

प्रेम संबंधातून 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?