सरपंचाने पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल केले नाही
सतिष गायकवाड । बीड
रमाई घरकुल योजनेची फॉर्म दाखल करण्याची तारीख 25 डिसेंबर होती. तारखेच्या आत संबंधीत गावच्या सरपंचांनी घरकुलाबाबतचे प्रस्ताव त्या त्या पंचायत समितीमध्ये दाखल केले नाही. प्र्रस्ताव दाखल न केल्यामुळे अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू शकतात. याची दखल वरिष्ट अधिकार्यांनी घेवून प्रस्ताव का दाखल करण्यात आले नाही याचा जाब सरपंचांना विचारायला हवा.
सर्वसामान्य नागरिकांना घरकूल मिळावे यासाठी रमाई घरकुल योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेकडो लाभार्थ्यांना लाभ मिळतो. यावर्षी प्रस्ताव दाखल करण्याची तारीख 15 डिसेंबर होती. मात्र पुन्हा तारीख वाढवून ती 25 डिसेंबर करण्यात आली. घरकुलासाठी सरपंचांनी ठराव घ्यायचे असतात आणि ते ग्रामसेवकाच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये दाखल करायचे असतात. तारखेच्या आत पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल करण्यात आले नसल्याने अनेक लाभार्थी घरकूलपासून वंचित राहणार आहेत. वेळेवर प्रस्ताव का दाखल करण्यात आले नाही? याचा जाब वरिष्टांनी विचारायला हवा.