Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडबिबट्याची दहशत, अफवांचे पेव

बिबट्याची दहशत, अफवांचे पेव

बिबट्याची दहशत, अफवांचे पेव
वॉटस्‌ऍपवरून बिबट्याच्या बनावट पोस्ट व्हायरल
बीड (रिपोर्टर)- सध्या आष्टीमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली असून नागरिक घराबाहेर पडत आहेत. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी बाजरी शेतकर्‍यांनी पेरली आहे. त्या शेतीला याच काळात पाणी देणे गरजेचे आहे नसता पूर्ण पीक वाया जाते, मात्र गेवराई, माजलगाव तालुक्यात प्रत्यक्ष बिबट्या आढळला नसला तरी गावागावात सोशल मीडियावर अफवांचे पेव पसरत असल्याने येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नेटकरी कुठल्या तरी वेबसाईटवरील फोटो काढून ते अमूक अमूक शेजारच्या गावचे आहेत म्हणून वॉटस्‌ऍपद्वारे दहशत निर्माण करत आहेत. अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नसता ‘कोल्हा आला….’ असे होऊ नये.
आष्टीमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत तिघा जणांची शिकार केली आहे. त्यामुळे तेथे खरोखरच बिबट्या असून नागरिकांनी घाबरणे गरजेचे आहे, तो रात्रीतून कुठल्याही तालुक्यात जाऊ शकतो मात्र अद्याप तरी तो आष्टीमध्येच आहे त्यामुळे विनाकारण नेटकर्‍यांनी या या तालुक्यात बिबट्या दिसला म्हणून विनाकारण दहशत पसरवू नये, सध्या शेतीचे लाख मोलाचे नुकसान होत आहे. रात्री शेतकरी दहशतीमुळे शेतात जात नाहीत. दिवसा लाईट टिकत नाही. त्यामुळे दिवसा विद्युतपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. गेवराईमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबट्या नव्हे तर तरस आढळून आला होता मात्र नागरिकांनी कुठलीही शहानिशा न करता बिबट्या म्हणून त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली होती.

Most Popular

error: Content is protected !!