बीड (रिपोर्टर): उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार सुनील प्रभू यांनी काल रिपोर्टर क्रीडा अकॅडमीच्या वतीने आयोजीत क्रिकेट स्पर्धेच्या स्थळी सदिच्छा भेट देत काही काळ क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. या वेळी रिपोर्टर प्रिमिअर लिगचे सर्वेसर्वा तथा संपादक शेख तय्यब यांनी सुनील प्रभू यांचे स्वागत केले.

रिपोर्टर क्रीडा अकॅडमीच्या वतीने श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर गेल्या दोन दिवसांपासून रिपोर्टर प्रिमीअर लिग सिझन 6 क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. काल सकाळी लिजंड वॉरिअर्स वि. माही यांच्या दरम्यान खेळला जात होता. त्यावेळी अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार सुनील प्रभू यांनी मैदानात येऊन या स्पर्धेला भेट दिली. या वेळी रिपोर्टर क्रिडा अकॅडमीचे सर्वेसर्वा संपादक शेख तय्यब यांनी सुनील प्रभू यांचे स्वागत केले. काही काळ सुनील प्रभू यांनी क्रिकेट खेळाचा आनंद व्यासपीठावरून घेतला.












